संपादक-२००७ - लेख सूची

पत्रबोध

केशवराव जोशी, तत्त्वबोध , कल्याण-कर्जत हायवे, नेरळ (रायगड) ४१०१०१, दूरभाष : ९५२१४८-२३८६५२ आ.सु.च्या सप्टे.०७ च्या अंकारा “वायकांचे आ.सु.बद्दलचे विचार मागविले आहेरा” हे फार चांगले झाले. दि.य.देशपांडे ह्यांनी आसुच्या पहिल्या अंकारा (एप्रिल १९९०) मध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की “शंभर वर्षांपूर्वीचे जे आगरकरांनी समाजास बुद्धिवादी घडविण्याचे कार्य करण्यास आरंभ केला; ते आज अपुरे ठरल्यामुळे पूर्णत्वाला नेण्याचे कार्य …

संपादकीय

प्रिय वाचक पुनश्च हरि:ओम् हे टिळकांनी म्हणणे ठीक आहे, पण सुधारकाला ही शब्दावली घेण्याचा अधिकार आहे का, असा विचार क्षणभर मनात चमकून गेला. सुधारकाला ‘श्री’वरही हक्क नाही असे बऱ्याच मंडळींना वाटते. ते पत्राच्या अग्रभागी ‘श्री’कार घालत नाहीत. पण लिखाणात ‘अथश्री’, ‘इतिश्री’चा प्रयोग वा मानत नसतील अशी आशा आहे. ‘भाषा बहता नीर है’ हा मुखपृष्ठावरचा विचार …

अरिस्टॉटलची न्यायसंकल्पनाः [अरिस्टॉटल (३८४-३२२ बी.सी.]

कायदा करण्याचा ज्यांना अधिकार आहे, अशा मंडळाने केलेले कायदे हे कायदेशीरच असणार आणि त्यांचा उद्देश न्याय प्रस्थापित करणे हाच असल्याने कायदा न्याय्यच असतो. समाजासाठी सुख निर्माण करणे आणि टिकविणे हे एका अर्थी ज्यांना आपण कायदेशीर किंवा न्याय्य वर्तने म्हणतो, त्यांचे कार्य आहे. शौर्याची, संयमाची, सुस्वभावी माणसांची कृत्ये आणि अन्य सद्गुणांची कृत्ये करण्यास कायदा आपणांस बाध्य …

संपादकीय

जातिव्यवस्थेवरच्या लेखांना आजचा सुधारक ने प्रसिद्धी द्यावी, अशी इच्छा काही वाचक वेळोवेळी व्यक्त करतात. दुसऱ्या टोकाला त्या आग्यामोहोळात हात घालू नये, असे एक मत आहे ! एकूणच भारतीयांना जातींबाबत तटस्थपणे लिहिणे अवघड जाते. लेखांतील एखादे निरीक्षण, एखादा निष्कर्ष, एखादे मत, मान्य करावे की नाही याचा निर्णय बहुतांश वेळी लेखकाची जात पाहून घेतला जातो. हे जातींबद्दलच्या …